पवारांच माहीत नाही, सुळे लढणार !

'मविआ'च्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंची सावध प्रतिक्रिया
Edited by: विनायक गावस
Published on: October 27, 2023 16:29 PM
views 212  views

सावंतवाडी : पक्षात फुट पडल्यानंतर आगामी निवडणुकीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार का ? झाल्यास दोन 'राष्ट्रवादी' आमने-सामने येणार का असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांना केला असता त्या म्हणाल्या, पवार लढणार का माहिती नाही. पण, सुळे लढणार ! पवार काय करणार याची कल्पना नाही. कुठले पवार लढणार असतील अशी बातमी माझा कानावर नाही. पण, सुळे लढणार एवढ निश्चित अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

दरम्यान, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत आमदारकीसाठी स्पर्धा असुन अर्चना घारेंचा नावाची कार्यकर्त्यांकडून मागणी होत असताना तिकिट दिल जाणार ? की शेवटच्या क्षणी उमेदवार वेगळा असणार असं विचारलं असता. कार्यकर्त्यांचा भावना असतात. आम्ही संघटना म्हणून काम करत आहोत. आमचे सहकारी आहेत त्यांच्या भावना ऐकून घ्यावा लागतात. हा तो पक्ष नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. इथे लोकांचा मानसन्मान होतो. इथे लोकशाही आहे. दडपशाही तिथे आहे, इथे नाही असं मत त्यांनी व्यक्त केल. तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम करतो. खोक्यासाठी आम्ही राजकारणात नाही. सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात चांगला बदल घडविण्यासाठी आम्ही राजकारणात आहोत. आम्हाला तो बदल करायचा आहे. सावंतवाडीच्या जनतेचे मनपूर्वक आभार मानते. दोन वेळा त्यांनी राष्ट्रवादीचा आमदार निवडून दिला. नंतर काय झाल याची उणीधुणी  काढायची नाही आहेत असंही त्या म्हणाल्या.

यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, निरीक्षक शेखर माने, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अँड. दिलीप नार्वेकर, विकास सावंत, राष्ट्रवादी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, अँड. सायली दुभाषी आदी उपस्थित होते.