
वैभववाडी : तळेरे-कोल्हापुर राष्ट्रीय महामार्गावर नाधवडे येथे झाड मोडून अर्ध्या रस्त्यावर पडले आहे.गेल्या चार दिवसांपासून हे झाड त्याच स्थितीत रस्त्यावर आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने याकडे दुर्लक्ष केला आहे.अद्याप हे झाड न हटविल्यामुळे वाहनचालकांना याचा त्रास होत आहे.
तळेरे - वैभववाडी मार्गावर नाधवडे धरणानजीक चार दिवसांपूर्वी झाड अर्ध्या रस्त्यावर पडले आहे. अर्धवट स्थितीत पडलेल्या या झाडांमुळे या ठिकाणांहून सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. यामुळे वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. गणेश चतुर्थी काही दिवसांवर आली असल्याने महामार्गावरील वाहतूक वाढली आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.प्राधिकरण विभागाने झाड तात्काळ हटवून मार्ग खुला करावा अशी मागणी होत आहे.