अडीच लाखांपेक्षा जास्त मताधिक्यान निवडून येणार : नारायण राणे

Edited by: विनायक गांवस
Published on: April 19, 2024 08:10 AM
views 265  views

रत्नागिरी : उन्हात तापणाऱ्या कार्यकर्त्यांसह महायुतीचा नेत्यांचे नारायण राणे यांनी आभार मानले. तुमचं प्रेम, प‌क्षनिष्ठा पाहिल्यावर मी खूप नशिबवान असल्याचं जाणवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ४०० पारचा संकल्प केला आहे. भारत विकसित देश बनविण्यासाठी, आत्मनिर्भर भारतासाठी नरेंद्र मोदी हॅट्रिक करणार आहेत. चारसो पार करताना रत्नागिरी सिंधुदुर्गचा खासदार त्यात असावा यासाठी आवाहन उमेदवार नारायण राणे यांनी केल. तर अडीच लाखांपेक्षा अधिकच्या मताधिक्यान निवडून येणार असल्याचा विश्वास राणेंनी व्यक्त केला.