
देवगड : देवगड तालुक्यातील महात्मा गांधीविद्यामंदिर तळेबाजार प्रशालेमध्ये आठवडी बाजार व रानभाजी महोत्सव पार पडला त्यावेळी तळेबाजार पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर संस्था सदस्य विश्वास सावंत बाळकृष्ण पारकर शिक्षक पालक संघाचे सदस्य बापु जोईल इतर पालक संघाचे सदस्य उपस्थित होते. तसेच शाळेचे मुख्याध्यापक राजेश वाळके सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी उपस्थित होते. संस्थाचालक व शिक्षक पालक संघाचे सदस्य यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे व बाजाराचे फित कापून उद्घाटन करण्यात आले.
या आठवडी बाजारात व रानभाज्या प्रदर्शनासाठी 135 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आपल्या परिसरात असणाऱ्या सर्व रानभाज्या या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या पालक व शिक्षकांकडून मोठ्या प्रमाणात या रानभाज्या खरेदी करण्यात आल्या विद्यार्थ्यांनी आणलेला भाज्या तसेच वस्तू दोन तासांमध्ये बऱ्याच प्रमाणात विक्री होऊ लागली त्याचप्रमाणे विद्यार्थी घेणाऱ्या गिर्हाईकाला भाज्यांचे महत्त्व पटवून देत होते.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांना हा कार्यक्रम आयोजन करण्याचे विचारण्यात आले त्यावेळी आपले विचार मांडताना त्यांनी असे सांगितले की आजच्या मुलांना रान भाज्यांची नावे समजावीत त्यांचे आपल्या आहारातील महत्व समजावे त्याचप्रमाणे रोजच्या जीवनामध्ये लहान मुलांनी मॅगी,बेकरीचे पदार्थ , व चायनीज पदार्थ खाणे टाळावेत
व रानभाज्या कश्याप्रकारे आपल्या आहारामध्ये आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या उपयुक्त आहेत याबद्दल त्यांच्या कडून रान भाज्यांचे महत्व सांगण्यात आले.त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना खरेदी विक्री व्यवहार हा बाजारातून समजावा यासाठी आठवडी बाजार व रान भाज्यांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांना भविष्यात उपयोगी व्हावे हा या मागचा खरा उद्देश होता.या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख चनबसुगोळ मॅडम सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.