वन्य हत्तींचा मोर्चा कोलझर, तळकट गावांच्या दिशेने | नारळ फोफळींची गावे संकटात

जिल्हा-दौऱ्यावर-येणारे-मुख्यमंत्री-हत्ती-प्रश्नाकडे-लक्ष-देणार-का
Edited by: संदीप देसाई
Published on: June 05, 2023 20:59 PM
views 571  views

संदीप देसाई : दोडामार्ग : कोलझर मधील कोलझरवाडी येथे सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तीन हत्तींच्या कळपाचं दर्शन झाल्याने सुपारी माड बागायातीची गावे म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या कोलझर - तळकट पंचक्रोशी शेतकरी बागायतदार पूर्णतः हडपडून गेले आहेत. 

 दोडामार्ग तालुक्यात गेली वीस वर्षे हत्तींचा उपग्रह सुरूच आहे मात्र त्यावर ठोस उपाययोजना करण्यात राज्य शासन सबसे ठरला आहे शासन आपल्या दारीच्या निमित्ताने मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत निदान त्यांनी तरी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्न लक्ष घालणं आवश्यक आहे. गेली काही वर्षे तीलारी खोऱ्यात धुमशान घालणाऱ्या या हत्तींच्या कळपाने जवळ पास पुन्हा एकदा माड, केळी, सुपारी मोठ्या प्रमाणात लागवड असलेल्या कोलझार व तळकट गावांकडे केर भेकुर्ली शिरवल या मार्गे आपला मोर्चा वळविला आहे. मुळे येथील शेतकरी कमालीचे व्यथित झाले असून सायंकाळ पासून ते वनअधिकारी यांचेशी संपर्क साधून होते. रात्री ८ च्या सुमारास वसंत सावंत ( अमरोस्कर) यांच्या घराच्या मागील भागात या ३ हत्तींच्या कळपाच दर्शन झालं आहे.