
सावंतवाडी : जहांगिर आर्ट गॅलरी, मुंबई येथे होणाऱ्या २६ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन २०२५-२६ साठी तुळस येथील आर्टिस्ट आशिष कुंभार-बांदेकर यांनी घडविलेली स्कल्पचर कलाकृती ‘मॉन्सट’री निवड झाली आहे. प्रदर्शन फेब्रुवारी २०२६ मध्ये होणार असून १९ ते २१ जानेवारीदरम्यान राज्यातून विविध कलाकृती दाखल होणार आहेत.
आशिष कुंभार यांनी या कलाकृतिच्या माध्यमातून लहान मुलींवरील वाढत्या अत्याराचा मुद्दा मांडला आहे. बिजातून एक रोटपं उगवतं. त्या रोपट्याभोवती मानवी राक्षसी हात दाखले आहेत. यापूर्वी २०२० मध्ये बॉम्बे आर्ट ऑल इंडिया स्पर्धेत त्यांया कलाकृतीची निवड झाली होती. २०१९ मध्ये आर्ट सोसायटी ऑफ इंडिया अवॉर्ड त्यांना मिळाला. तर २०१८ मध्ये राज्य कला पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.










