
सावंतवाडी : नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांनी सावंतवाडी शहरात नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांच्यासमवेत पाहणी केली. यावेळी शहरातील बोटिंग प्रकल्प, उपजिल्हा रुग्णालय नजीक असलेली खुली जागा, काझी शहबुद्दीन हॉल, रोटरी पार्क नजीक असलेली जागा, तसेच आठवडा बाजारपेठ येथे भेट दिली. त्यावेळी स्वच्छतेबाबत नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांना सुचना देण्यात आल्या. यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे नगरसेवक सुधीर आडीवरेकर, प्रतिक बांदेकर, देवेंद्र टेमकर, नगरसेविका दिपाली भालेकर, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले आदी उपस्थित होते. तसेच नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी. गोविंद गवंडे, स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, सभा लिपिक आसावरी केळबाईकर, शहर समन्वयक दत्तात्रय पंडित आदी उपस्थित होते. या पाहणी दरम्यान नगराध्यक्षा यांनी सफाई कर्मचारी यांच्याशी व बाजारपेठ मधील व्यापारी यांच्याशी संवाद साधला.










