
सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील स्वच्छतागृहांची अक्षरशः दैना झाली आहे. सार्वजनिक शौचालयातील फर्ध्या, नळ तुटले असून ड्रेनेजची टाकी देखील भरल्यान दुर्गंधी पसरली आहे. वारंवार कार्यकारी अभियंतांना पत्रव्यवहार करूनही याकडे कानाडोळा केला गेला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ निकृष्ट कामात मलिदा खाण्यासाठीच आहे का ? असा सवाल नागरिकांनी केला आहे. दरम्यान, सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून न.प. सावंतवाडीच्या सहकार्यानं सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या ड्रेनेज टाक्या स्वच्छ केल्यान रूग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. वैद्यकीय अधिक्षकांकडून याच्या देखभाल व दुरुस्तीसाठी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंतांकडे वारंवार पत्रव्यवहार केले. मात्र, टेंडर अन् टक्केवारीच्या जुमल्यात अडकलेल्या बांधकामन याकडे दुर्लक्ष केलं. सद्यस्थितीत बाथरुम, शौचालयाच्या फरश्या, नळ, संडासची भांडी भग्न अवस्थेत आहे. ड्रेनेजच्या टाक्या ओव्हरफ्लो होत आहेत. त्यामुळे नाक मुठीत धरून या सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करावा लागत आहे. स्वच्छतागृह, शवागृहच छप्परही मोडकळीस आल आहे. मात्र, बांधकाम विभाग आपल्याच धुंदीत मग्न आहेत. जनसामान्यांचा त्रासाच त्यांना पडलेलं नाही. यामुळे हा विभाग केवळ मलिदा खाण्यासाठीच आहे का? असा सवाल सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
दरम्यान, सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून रवी जाधव व सहकारी यांनी पुढाकार घेत स्वच्छता मोहीम हाती घेतली. नगरपरिषदेच्या मदतीने संडास, बाथरूम टाक्या सक्शन व्हॅन बोलावून साफ करण्यात आल्या. शासनाच हे काम सामाजिक बांधिलकी जपत करण्यात आल. सरकारन यासाठी निधी दिलेला असताना सामाजिक कार्यकर्त्यांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. त्यामुळे या कामासाठीच्या निधीच सार्वजनिक बांधकाम आता करणार काय ? हा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे.