गोव्यात 'भायलो' हे आम्हाला का ऐकावं लागतं..?

▪️ काजू शेतकऱ्यांवर सुलतानी संकट : डॉ. जयेंद्र परुळेकर
Edited by: विनायक गावस
Published on: March 12, 2024 05:33 AM
views 303  views

सावंतवाडी : दोन-तीन दिवसांपूर्वी दोडामार्ग चौकात काजू शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. रास्ता रोको करण्याची परिस्थिती त्यांच्यावर उलटली. शेतकऱ्यांवर आस्मानी संकट असतं तसं सुलतानी संकट काजू शेतकऱ्यांवर आहे असं विधान उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी केल. तर आजही आमच्या रुग्णांना गोव्याला जाव लागत आहे. गोव्यात 'भायलो' हे आम्हाला का ऐकावं लागतं ? असा सवाल त्यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना केला.

ते म्हणाले, आपला कोंकणातील काजू चविष्ट आहे. मात्र, यावर केंद्रातील मोदी सरकारनं नियोजनबद्ध संकट आणलं आहे. लाखो टन काजू आयात केल्यान स्थानिक काजू शेतकऱ्यांवर संकटं कोसळलं. १६० रू ओल्या काजूला एकेकाळी दर होता. पण, आज घाट्याचा धंदा करावा लागत आहे. आयात दर कमी केल्यानं चविष्ट नसणारा काजू इथे यायला लागला आहे. अर्थसंकल्पात काजूला स्थान नसताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर केवळ फसवणूक करत आहे. १५ लाख टन काजू बी परदेशातून येत आहे. तर साडेसात लाख टन काजू बी उत्पादन देशाच आहे. त्यामुळे स्थानिक काजू बीला रक्कम मिळत नाही. परदेशातील हा काजू ८०-८५ रूपयांन पडतो. स्थानिक काजू १२५ रूपयाला देखील परवडत नाही. अन् शालेय शिक्षणमंत्री म्हणातात १३५ रू. प्रती किलोन विकत घेणार ? केवळ फसवणूक केली जात आहे. ते खोटं सांगत आहेत.बेरोजगारी, महागाई चरण सीमेवर असताना तुम्ही केलं काय ? त्यात आता काजू बागायतदार देशोधडीला लागले आहेत. हे केंद्र सरकारमुळे ओढावलेल सुलतानी संकट आहे.

दरम्यान, चष्मा कारखाना, सावंतवाडी टर्मिनस, सेटॉफ बॉक्स, मल्टिस्पेशालीटी हॉस्पिटल आहे कुठे ? असा सवाल उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी केला.   आजही रुग्णांना गोव्याला जाव लागत आहे. 'भायलो' हे आम्हाला का ऐकावं लागतं आहे. कारण, चांगलं रूग्णालय आमच्या भागात बनू शकल नाही. जिल्ह्याची नव्हे तर राज्याची आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नावान फक्त भुलथापा मारल्या जातात अशी टीका डॉ. परूळेकर यांनी केली.