गावात हवा कुणाची ? | वेंगुर्ला तालुक्यात सरपंच पदासाठी 45 तर सदस्य पदासाठी 240 उमेदवारांनी अर्ज दाखल

तालुक्यात 30 पैकी 23 ग्रामपंचायतींमध्ये होतोय सत्तासंघर्ष !
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 01, 2022 20:32 PM
views 296  views

वेंगुर्ले: तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण सरपंच पदासाठी ४५ तर सदस्य पदासाठी २४० उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून आज १ डिसेंबर रोजी सरपंच पदासाठी ३० तर सदस्य पदासाठी १८३ अर्ज दाखल करण्यात आले. तालुक्यात ३० ग्रामपंचायती पैकी २३ ग्रामपंचायतच्या निवडणूका होत आहेत. 

      दि. ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर या दोन दिवसात सिताराम राणे, मायकल लोबो, अर्जुन भुते, भूषण मांजरेकर (रेडी), संजना करंगुटकर (चिपी), सचिन उर्फ दादा सारंग, समाधान बांदवलकर, उदय गोवेकर (दाभोली), आकांक्षा चव्हाण, रिया चव्हाण (म्हापण), प्राची नाईक व प्रणाली नाईक (वेतोरे), प्राची नाईक व तृप्ती परब (शिरोडा) व प्रतीक्षा मुंडये, सुविधा खुळे, अंकिता वायंगणकर (भोगवे), मोहन जाधव, बाळा जाधव (आसोली),  विनायक खवणेकर, रामचंद्र भगत, मंगलदास टिकम, प्रकाश खोबरेकर (मेढा), शांताराम जाधव (पालकरवाडी), निलेश चमणकर (उभादांडा), अनन्या पुराणिक (वजराट), अंजली तेली,  प्रणिती आंबडपालकर (परुळेबाजार), सुशील नांदोस्कर,  वैभवी पोतदार, रुपाली नाईक (मठ),  गणेश गावडे, शेखर गावडे (अणसूर), शमिका बांदेकर (परबवाडा), निलेश सामंत, प्रमोद परब (कुशेवाडा) यांनी अर्ज दाखल केले आहेत.