गावात हवा कुणाची ? | स्वबळावर लढण्यास भाजप सज्ज | संजु परब यांची ललकारी

दीपक केसरकर आता कोणती भुमिका घेणार ? याकडे लक्ष
Edited by: विनायक गांवस
Published on: November 22, 2022 16:59 PM
views 224  views

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी सावंतवाडी तालुक्यातील ५२ ही ग्रामपंचायतवर आपला झेंडा फडकविण्यास सज्ज झाली आहे. सर्व गावात भाजपची पॅंनल तयार आहे. आम्ही फक्त विजयाची वाट पाहत आहोत. तो विजय नक्कीच होईल, खरेदी- विक्री संघाची पुनरावृत्ती होईल. तर बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आम्हाला युती करायची नाही आहे. प्रत्येक गावात कार्यकर्ता काम करत असतो. प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे हा आमचा उद्देश आहे. त्या संदर्भात आम्ही आमच्या नेत्यांना समजावू. नेत्यांची इच्छा आहे युती करून लढायची. पण, त्यांना आम्ही स्वबळावर लढण्याची विनंती करू असं मत भाजप जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी युतीबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे मतदारसंघाचे आमदार तथा बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर आता कोणती भुमिका घेणार ? याकडे लक्ष लागून राहिले आहे.