कुठे वाहणार वादळी वारे..?

Edited by:
Published on: June 07, 2023 11:06 AM
views 100  views

पूर्व मध्य अरबी समुद्र आणि पश्चिम मध्य आणि दक्षिण अरबी समुद्राच्या लगतच्या भागांवर वादळी वाऱ्याचा वेग ९०-१०० किमी प्रतितास राहून ११० किमीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आणि संध्याकाळपासून ते ९५-१०५ किमी प्रति ताशी राहून ११५ किमी प्रतितास होण्याची शक्यता आहे. याच परिसरात दिनांक ८ जून रोजी कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र किनार्‍यावर आणि जवळून ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारा वाहून त्याचा वेग 60 किमीपर्यंत वाढणायची शक्यता आहे.


दिनांक 9 जून: मध्य अरबी समुद्रावर वाऱ्याचा वेग १०५-११५ किमी प्रतितास राहून १२५ किमीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आणि त्याच भागात ९ जूनच्या संध्याकाळपासून वाऱ्याचा वेग १२५-१३५ किमी प्रतितास राहून १५० किमी प्रतितास होण्याची शक्यता आहे. दक्षिण अरबी समुद्राच्या लगतच्या भागात ५०-६० किमी प्रतितास वेगाने वारा वाहून त्याचा वेग  ७० किमी प्रतितास एवढा वाढण्याची शक्यता आहे. कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र किनार्‍यावर आणि जवळून ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारा वाहून त्याचा वेग 60 किमीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.


दिनांक १० जून: मध्य अरबी समुद्रावर वादळी वाऱ्याचा वेग ताशी १२५-१३५ किमी प्रति तास राहून १५०  किमीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दक्षिण अरबी समुद्राच्या लगतच्या भागांमध्ये आणि उत्तर कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र किनार्‍याजवळील वाऱ्याचा वेग ४०व-५० किमी प्रति ताशी राहून 60 किमीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.