राणेंच्या विजयासाठी शहरात महायुतीनं कसली कंबर

डोअर टू डोअर प्रचारावर भर ; सुधीर आडीवरेकर यांचा पुढाकार
Edited by: विनायक गांवस
Published on: April 27, 2024 07:25 AM
views 257  views

सावंतवाडी : शहारत प्रभाग क्रमांक पाचमध्ये माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांच्या पुढाकारातून महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्राचाराचा शुभारंभ करण्यात आला. मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते या प्रचारात सहभागी झाले होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शहरासह मतदारसंघातून मोठं लीड देणार असल्याचा दावा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला.

जुनाबाजार येथील नरसोबा मंदीर येथे श्रीफळ ठेवत महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सावंतवाडी शहरासह मतदारसंघातून नारायण राणे यांच्या मागे मोठं मताधिक्य मिळवून देऊ असा विश्वास माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केला. या ठिकाणी मंत्री दीपक केसरकर व शिवसैनिक, मनसैनिक, राष्ट्रवादी व रिपाई आदी मित्रपक्ष मिळून ही जागा विजयी करू अस तेली म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ४००  पारच्या नाऱ्याला कोकणातून सुरूवात होणार असून सर्व कार्यकर्ते राणेंच्या विजयासाठी पेटून उठले आहेत. त्यामुळे राणे 85 ते 90 टक्के मतदान घेऊन मोठ्या मताधिक्याने विजय होतील असा विश्वास भाजप युवा नेते विशाल परब यांनी येथे व्यक्त केला. दरम्यान, महायुतीतील कोणत्याही कार्यकर्त्यामध्ये आता मतभेद नसून सर्वांची मने जुळलेली आहेत. त्यामुळे सर्वजण एक दिलाने काम करून राणेसाहेबांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणतील, असे श्री परब यावेळी बोलताना म्हणाले. ते जुना बाजार येथे प्रचार शुभारंभ कार्यक्रमानिमित्त बोलत होते.

दरम्यान, शहरातून घरोघरी प्रचारावर भर दिला आहे. दीपक केसरकर, राष्ट्रवादी, मनसेसह जनता आमच्या सोबत आहे. त्यामुळे विजय निश्चित आहे ‌असा विश्वास माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केला. विधानसभा मतदारसंघातून नारायण राणे यांच्यासारख्या दुरदृष्टी असलेल्या नेत्याला मोठं मताधिक्य मिळवून देऊ, राणे-केसरकर एकत्र आल्यान कोकणचं भवितव्य उज्वल असेल असं मत माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी व्यक्त केले. महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यामागे महिला शक्ती मोठ्या प्रमाणात मागे असून दिवसरात्र एक करत त्यांना लीड देऊ भाजप महिला शहराध्यक्ष मोहीनी मडगावकर म्हणाल्या. 

यानंतर डोअर टू डोअर जात महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी नारायण राणेंना विजयी करण्यासाठी मतदानाच आवाहन केले.याप्रसंगी माजी आमदार राजन तेली, युवा नेते विशाल परब, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, बाबु कुडतरकर, देव्या सुर्याजी, अजय गोंदावळे, संतोष गांवस, बंटी पुरोहित, मोहीनी मडगावकर, किशोर चिटणीस, परिक्षित मांजरेकर, अर्चित पोकळे, केतन आजगावकर, सत्यवान बांदेकर आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.