मी महाराष्ट्राच्या बाहेर राहत नाही ; जिल्हाधिकाऱ्यांच्या 'त्या' उत्तरावर काय म्हणाले पालकमंत्री ?

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 10, 2023 17:26 PM
views 444  views

सिंधुदुर्ग : सध्या शाळा, कॉलेज सुरु झाले आहेत. विद्यार्थ्यांना दाखल्यांची अडचण होत आहे. सेतू मार्फत विद्यार्थ्यांना दाखले मिळत नाहीत.  नेमकी अडचण काय आहे ? असा सवाल खुद्द पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीच केला. यावर जिल्हाधिकारी यांनी राज्याभरात सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्याचे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या उत्तरावर पालकमंत्री चव्हाण यांनी नाराजी व्यक्त करत मी मी महाराष्ट्राच्या बाहेर राहत नाही. मी डोंबिवलीला राहतो. असे सांगत अशी काही परिस्थिती नाही. कोणालाही पाठीशी घालण्यात येऊ नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतिमान प्रशासन करत आहेत. जर सहा महिन्यानंतर विद्यार्थ्यांना दाखले मिळाले तर त्यांना त्याचा काय उपयोग ? विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. सर्वच विभागात कुठचीच प्रकरणे प्रलंबीत ठेऊ नका अशी समज पालकमंत्री चव्हाण यांनी दिली. तसेच प्रलंबीत दाखल्यांची आकडेवारी मागितली. तर 714 दाखले प्रलंबीत असल्याचे धक्कादायक उत्तर अधिकाऱ्यांनी दिले.