
दोडामार्ग : नुकत्याच झालेल्या मोरगाव ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकित लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलेल्या संतोष आईर यांचं मावळत्या सरपंच नीता देऊलकर व उपसरपंच अभिमन्यू ठाकूर यांनी स्वागत केलं. तर नूतन सरपंच आईर यांनी त्या दोघांना शाल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन निरोप दिला.
बुधवारी हा नवनियुक्त सरपंच स्वागत व विद्यमान सरपंच यांच्या निरोपाचा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयात झाला. यावेळी श्रीमती निता नारायण देऊलकर यांनी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणुन आलेल्याली लोकनियुक्त सरपंच संतोष वसंत आईर यांचे पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देवून स्वागत केले. तसेच नवनिर्वाचित सदस्य यांचे सुद्धा फुल पुष्प देवुन स्वागत केले. ग्रामपंचायत अंतर्गत चांगल्या कामांसाठी शुभेच्छा दिल्या. लोकनियुक्त सरपंच संतोष आईर यांनी विद्यमान सरपंच श्रीमती निता नारायण देऊलकर व उपसरपंच अभिमन्यु अर्जुन ठाकुर आणि सदस्य यांचे शाल व श्रीफळ देवुन स्वागत केले. त्यावेळी ग्रामपंचायत सचिव कुणाल कृष्णा मसके, मोरगाव तलाठी पवन लोले, केंद्रचालक स्मिता शिवराम सावंत ग्रामपंचायत कर्मचारी सागर वासुदेव चव्हाण, वर्षा दळवी उपस्थित होते. यावेळी अंगणवाडी सेविका हेमा हरिश्चंद्र नाईक यांना ज्ञानदिप पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन मावळत्या सरपंच निला देऊलकर व नवनिर्वाचित सरपंच संतोष आईर आणि सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आले.