WEATHER ALART | सिंधुदुर्गात पावसाची शक्यता | हवामान विभागाची माहिती

खबरदारी घेण्याची जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची सूचना
Edited by: प्रतिनिधी
Published on: April 13, 2023 16:02 PM
views 288  views

सिंधुदुर्ग : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक 13  एप्रिल 2023 रोजी तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची, गारा पडण्याची, विजा चमकण्याची व 45 ते 55 किमी प्रती तास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे. 

15 एप्रिल 2023 रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची  व 30 ते 40 किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे. तरी त्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी, अशी सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांनी केलीय.