
सावंतवाडी : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वर्कशॉपमध्ये शस्त्र पूजनाचा कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला. खंडेनवमीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाला कॉलेजचे प्राचार्य डॉ.रमण बाणे, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वर्कशॉप इन्चार्ज पुष्कर परब यांच्या हस्ते वर्कशॉपमधील साहित्य व यंत्रांची पूजा करण्यात आली आणि उत्तम ज्ञान व कौशल्य प्राप्त होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली.शस्त्र पूजनाच्या या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि परंपरांचे महत्त्व याची भावना वाढीस लागण्यात मदत झाली. प्राचार्य डॉ.बाणे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना शस्त्र पूजनाचे महत्त्व विशद केले आणि विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा योग्य वापर करून देशसेवा करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आयोजन कॉलेजच्या वर्कशॉप विभागाच्यावतीने करण्यात आले होते.