

सावंतवाडी : प्रशासकीय राजवट असणाऱ्या सावंतवाडी नगरपरिषदेनं घरपट्टी व पाणीपट्टीत मोठी वाढ केल्यान धक्का बसला आहे. १ एप्रिलपासून ही दरवाढ लागू होणार आहे. २५ रूपयांपासून ३९९ रूपये घरपट्टी असणाऱ्यांना सरसकट ४०० रूपये आकारणी करण्यात येणार आहे. सर्वसामान्य गोरगरीबांना यांची झळ बसणार आहे. २५ रूपये असणाऱ्या ३७५ रूपयांचा भुर्दंड बसणार आहे. पाणीपट्टीतही ३ रूपये वाढ केली जाणार आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आक्रमक भुमिका घेत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्यावर तोफ डागली आहे. सावंतवाडीकरांचा अंत पाहू नका, अन्यथा सीओ हटाव मोहिम राबवावी लागेल असा इशारा राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष राकेश नेवगी, बाबल्या दुभाषी यांनी दिला आहे.
घरपट्टी व पाणीपट्टीत मोठी वाढ केल्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष राकेश नेवगी, बाबल्या दुभाषी यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्यावर तोफ डागली आहे. जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते ऐकण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना वेळ नसतो. कधीही कार्यालयात उपस्थित नसतात. मुलभूत गरजांची पूर्तता न.प. कडून होत नाही आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर मुंबईत बसून नगरपरिषदेचा कारभार हाकत आहेत. यात नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. कुणालाही विचारात न घेता घरपट्टी व पाणीपट्टीत केलेली सरसकट व मोठी वाढ सामान्यांचा आर्थिक कणा मोडणारी आहे. एकिकडे भाजपचे अच्छे दिन ढगात गेल्यानं महागाई, बेरोजगारामुळे जनता होरपळून गेली असताना प्रशासन मनमानी कारभार करत जनतेची पिळवणूक करत आहे. प्रशासनान यावर पूनर्वीचार करत या निर्णयाला स्थगिती द्यावी, केसरकरांची पोपटपंची करणाऱ्या सीओंनी सावंतवाडीकरांचा अंत पाहू नये अन्यथा होणाऱ्या परिणामांस सामोरे जायची तयारी ठेवावी असा इशारा राकेश नेवगी यांनी दिला आहे.