उद्या 12 नंतर कळेलचं कुणाचे 12 वाजतील ! 

युतीचे 14 पैकी 14 उमेदवार निवडून येतील : महेश सारंग  
Edited by: विनायक गांवस
Published on: November 11, 2022 16:26 PM
views 183  views

सावंतवाडी : भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीच 'श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनल' शेतकऱ्यांचा विकासासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहे. राज्यातील युती सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांचा विकास करणार आहे. खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्याना लागणारी बी-बियाणे, खते मुबलक प्रमाणात पुरवठा केली जाणार आहेत. मोक्याच्या ठिकाणी जागा घेऊन सभासदांना व तालुक्यातील ग्राहकांना उच्च दर्जाचा किराणा माल माफक दरात उपलब्ध करून दिला जाईल. युतीचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला असून उद्या 14 पैकी 14 उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत विरोधकांचं विमान हवेत आहे, उद्या त्यांचं डिपॉझिट जप्त करणार असा दावा जिल्हा बँक संचालक तथा पॅनल प्रमुख महेश सारंग यांनी केलाय. 


शेतकरी आमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे आमच्या  पॅनलच्या पाठीशी आहे. त्यामुळे सर्व मतदार आम्हालाच मतदान करतील. आमदार नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेचं पाठबळ शेतकऱ्यांच्या मागे उभे करू अस मत त्यांनी व्यक्त केल. तर विमान टेक ऑफ घेणार की नाही हे कळेलचं. उद्या ४ वाजल्यानंतर मतमोजणी सुरु होणार असून आमचे उमेदवार विरोधकांच डिपॉझिट जप्त करत निवडून येतील. त्यामुळे उद्या12 नंतर कळेलचं कुणाचे 12 वाजतील ते दिसेल अस मत महेश सारंग यांनी व्यक्त केल. 


दरम्यान, खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्याना लागणारी बी-बियाणे, खते मुबलक प्रमाणात पुरवठा केली जाणार आहेत. मोक्याच्या ठिकाणी जागा घेऊन सभासदांना व तालुक्यातील ग्राहकांना उच्च दर्जाचा किराणा माल माफक दरात उपलब्ध करून दिला जाईल. शेतीसाठी लागणारी यंत्र सामुग्री भाडे तत्वावर उपलब्ध करून दिली जातील. भात खरेदी केंद्रे वाढवून शेतकऱ्याना जास्तीत जास्त दर देण्यासाठी प्रयत्न करणार असून विकास संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्याच्या बांधावर खते उपलब्ध करून दिली जातील. केंद्र व राज्य सरकारच्या योजना पोहचविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून संघाचे भागभांडवल वाढवून सभासदाचे व संघाचे हीत जपण्याचा प्रयत्न केला जाईल. तर सावंतवाडी संघ सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वोत्तम करणार असून आठवडा बाजारा दिवशी वाहनातून उच्च व चांगल्या दर्जाचा किराणा माल पुरविला जाईल मत व्यक्त करत उद्याच्या युतीच 'श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनल'च्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्याव अस आवाहन केल.