आम्ही पालकमंत्र्यांच्या पाठीशी : ॲड.अनिल निरवडेकर

Edited by:
Published on: November 08, 2024 15:38 PM
views 334  views

सावंतवाडी : महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन घेऊन गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या आम्ही ठामपणे पाठीशी असून या विधानसभा निवडणुकीत महायुतीसोबतच असल्याची माहिती ॲड.अनिल निरवडेकर यांनी दिली आहे.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे आमचे नेते असून त्यांच्या विकासाचे व्हिजन पाहूनच आमच्यासारखे सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या कामकाजाने प्रभावित होऊन काम करीत असताना या विधानसभा निवडणुकीत महायुती सोबत राहण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. कारण महायुतीला मतदान म्हणजे रवींद्र चव्हाण यांना मतदान हे आमचे ध्येय आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.