पर्यटन व्यावसायिकांच्या आम्ही सदैव पाठीशी : नितेश राणे

स्वप्नील बोभाटे यांच्या लॉजिंग अँड बोर्डिंगचं आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 16, 2023 20:02 PM
views 193  views

वैभववाडी: सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. पर्यटनपुरक व्यवसाय या ठिकाणी होणे आवश्यक आहे. येथील उद्योजक स्वप्नील बोभाटे यांनी उभारलेला लाॅजींग व्यवसाय या भागाची गरज होती.  कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणाऱ्या प्रमुख मार्गालगत असलेल्या आमंत्रण लॉजिंग अँड बोर्डिंगला पर्यटक आमंत्रण न देता सुद्धा भेट देतील. तरुणांनी असेच उद्योग उभे करावेत. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू, असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी दिला.


वैभववाडी संभाजी चौक येथे श्री बोभाटे यांनी उभारलेल्या  आमंत्रण लॉजिंग अँड बोर्डिंगचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सेक्रेटरी रोहिदास लोखंडे, वैभववाडी भाजपाध्यक्ष नासीर काझी, नगराध्यक्ष नेहा माईंणकर, माजी सभापती अरविंद रावराणे, माजी सभापती भालचंद्र साठे, उपनगराध्यक्ष संजय सावंत,माजी जि.प.सदस्य सुधीर नकाशे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, भाजपा भटका विमुक्त समाज सेल जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे, महीला अध्यक्षा प्राची तावडे, प्रकाश सावंत, व्यापारी मंडळ अध्यक्ष रत्नाकर कदम, नगरसेविका सुंदराबाई निकम, यामिनी वळवी, विद्या पाटील, दिपक माईणकर,रोहन कुडतरकर ,बोभाटे परिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आमदार नितेश राणे पुढे म्हणाले, राजकारणाला व्यवसाय बनवू नका, व्यवसाय करत करत राजकारण करा अशी शिकवण  नारायण राणे  यांनी आम्हा सर्वांना दिली आहे. व्यावसायिक स्वप्निल बोभाटे यांनी मुंबईत राहून देखील वैभववाडी शहरात व्यवसाय सुरू केला. हे फार कौतुकास्पद आहे. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी स्वप्निलच्या पाठीशी गंभीरपणे उभे आहोत असे सांगितले. या हॉटेल व लॉजिंग बोर्डिंग चा उपयोग जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी निश्चित होईल. अशा व्यवसायातून पर्यटनाला चालना मिळेल असे आमदारा नितेश राणे यांनी सांगितले. रोहिदास लोखंडे, नेहा माईणकर, स्वप्निल बोभाटे यांनी मनोगत व्यक्त केले.