
कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्यावतीने कलमठ टाकीवरून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली आहे. जलवाहिनीचे काम ३० आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत शहरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी या कालावधीत न.प. प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन न.पं.च्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.










