गांगोवाडी - किनईरोड येथील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा

सुशांत नाईक - सुजित जाधव यांची तत्परता
Edited by: उमेश बुचडे
Published on: June 06, 2023 19:37 PM
views 109  views

कणकवली : कणकवली शहरात पाणीटंचाईची झळ ही आता शहरातील प्रत्येक वाडी वस्तीवर पोहचू लागली आहे. मे महिना संपला जून उजाडला तरी अद्याप पावसाचे कोणतेही चिन्ह दिसत नाही अशा परिस्थितीत आपल्या नागरिकांच्या सेवेसाठी लोकप्रतिनिधींकडून टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

आज कणकवली शहरातील गांगोवाडी, किनईरोड येथील जागृत महिला कार्यकर्त्या अपूर्वा सुजित जाधव यांनी माजी नगरसेवक सुशांत नाईक यांच्याशी संपर्क साधून गांगोवाडी व किनईरोड येथील परिसरातील महिलांना पाणी टंचाईपासून थोडा दिलासा मिळवून दिला. त्याबद्दल माजी नगरसेवक सुशांत नाईक आणि सुजित जाधव यांचे नागरिकांनी कौतुक करत समाधान व्यक्त केले.