
दोडामार्ग : उसप बोकारवाडी येथे पाणी टंचाईमुळे तेथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. तरी त्वरित टँकरद्वारे येथील ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी उसप गावचे माजी सरपंच दिनेश नाईक यांनी दोडामार्ग पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले की, उसप बोकारवाडी येथे भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील लोकांनाना घर सोडण्याची वेळ आलेली आहे. उसप ग्रा.प. चे ढिसाळ नियोजन यास कारणीभूत आहे. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुका प्रसासनाने त्वरीत टँकर द्वारे पाणीपुरवठा करावा अशी मागणी श्री. नाईक यांनी निवेदनाद्वारे केली आहे.