
देवगड : देवगड आगारात सद्या तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे.उन्हामुळे आंगाची लाही लाही होत असताना देवगड येथे तीव्र पाणीटंचाई ची समस्या जाणवू लागली आहे.एकीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जात असताना दुसरीकडे नागरिक पाणीटंचाईचा सामना सद्या करावा लागत आहे. देवगड आगारातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्यामुळे पाणी विकत घेण्याची वेळ त्यांच्या वरती आली आहे.नादुरुस्त बोरवेल तत्काळ दुरुस्त करण्यासाठी आगार व्यवस्थापक निलेश लाड पुढाकार घेणार का ? असा सवाल प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.
देवगड आगारात गुरुवारपासून बोरवेल नादुरुस्त झाल्यामुळे देवगड आगारातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.ही वणवण थांबवण्यासाठी देवगड आगाराला पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. देवगड आगारातून मुंबई,पुणे, अक्कलकोट,तुळजापूर आदी भागांमध्ये लांब पल्ल्याच्या प्रवासी फेऱ्या सोडल्या जातात मात्र गेल्या दोन दिवसापासून बोरवेलचा पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे तुटपुंजा पाण्यावर गाड्यांची साफसफाई केली जाते मात्र ग्रामीण भागातल्या प्रवासी फेऱ्या पाण्याचा तुटवडा असल्यामुळे स्वच्छ केल्या जात नसल्यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. देवगड आगारातील बहुतांश विभागामध्ये पाणी विकत घ्यावे लागत आहे.तसेच नादुरुस्त बोरवेल तत्काळ दुरुस्त करण्यासाठी आगार व्यवस्थापक निलेश लाड पुढाकार घेणार का ? असा सवाल प्रवाशांमधून उपस्थित होत असून प्रवाष्यंची यामुळे खूप गैरसोय निर्माण होत आहे.