पाणी गुणवत्ता प्रशिक्षण महत्वाचे : डॉ. उमेश पाटील

Edited by:
Published on: March 16, 2025 12:12 PM
views 99  views

देवगड : ग्रामीण भागांमध्ये नियमित शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे व साथीच्या रोगांना आळा बसावा याकरीता पाण्याच्या गुणवत्तेत  सनियंत्रण  व सर्वेक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे . जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाचे काम प्रभावीपणे होण्याकरिता अशा प्रकारचे पाणी गुणवत्ता प्रशिक्षण महत्वाचे असल्याचे प्रतिपादन तालुका आरोग्य अधिकारी देवगड डॉ . उमेश पाटील  यांनी केले. पंचायत समिती देवगड आयोजीत तालुकास्तरीय पाणी गुणवत्ता प्रशिक्षण इंद्रप्रस्थ सभागृहात संपन्न झाले . या प्रशिक्षणाचा शुभारंभ सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने व तालुका आरोग्य अधिकारी डॉ . उमेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

या प्रशिक्षण कार्यशाळेत जल जीवन मिशन व पाणी गुणवत्ता , पाणी नमुने गोळा करणे बाबतची माहिती , क्षेत्रीय तपासणी संच FTK माहिती , प्रयोगशाळा तपासणी अहवाल , स्वच्छता सर्वेक्षण , WQMIS प्रणाली , पाणी गुणवत्ता व आरोग्य याबाबतची माहिती जिल्हा तज्ञ मार्गदर्शक श्रीनिवास कांदळगांवकर व प्रयोगशाळा तंत्रज्ञ समाधान ताटे यांनी दिली . या कार्यशाळेत आरोग्य विस्तार अधिकारी गंगुताई अडुळकर , पाणी गुणवत्ता तज्ञ हर्षदा बोथीकर , डाटा ऑपरेटक मोहीनी खडपकर आदी मान्यवर उपस्थित होते . तसेच या प्रशिक्षणात देवगड तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी, आरोग्य सेवक उपस्थित होते . या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या प्रशिक्षणाचे सुत्रसंचलन विनायक धुरी तर आभार हर्षदा बोथीकर यांनी मानले .