न्हावेली नं.१ शाळेला वॅाटर फिल्टर

निवृत्त आर्मी हवालदार कृष्णा नाईक यांचा पुढाकार
Edited by: विनायक गांवस
Published on: April 09, 2025 19:20 PM
views 221  views

सावंतवाडी : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा न्हावेली नं.१ मधील विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने निवृत्त आर्मी हवालदार कृष्णा सखाराम नाईक यांनी शाळेला वॅाटर फिल्टर भेट दिली.

या फिल्टरमुळे शाळेतील विद्यार्थ्यांना आता स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पिण्यास मिळणार आहे. या उपक्रमाबद्दल शाळेतील शिक्षक विद्यार्थी आणि शालेय व्यवस्थापन समितीने श्री नाईक यांचे आभार मानले. या वॅाटर फिल्टर प्रदान कार्यक्रमाचे आयोजन शाळेत करण्यात आले होते. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अंकुश मुळीक माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन गावडे माजी सरपंच शरद धाऊसकर मनोहर दळवी मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता नाईक शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृष्णा नाईक यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यांच्या या योगदानाने शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे.