
वैभववाडी : तालुक्यात आज झालेल्या मुसळधार पावसामुळे मांगवली पुनवर्सन गावठणात हाहाकार माजवला. येथील पाच घरात पुराचे पाणी शिरले.यामुळे मोठे नुकसान झाले.
भुईबावडा परिसरात आज ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. याचा सर्वाधिक फटका मांगवली पुनर्वसन गावठाण परिसराला बसला. या पावसाने भोम बौध्दवाडी पुनर्वसन गावठाणातील बाळकृष्ण सोनू कांबळे, चंद्रकांत कांबळे, मारुती कांबळे, अनिल कांबळे , अभय कांबळे यांच्या घराशेजारी असलेल्या ओढ्याचे पाणी घरात घुसल्यामुळे नुकसान झाले आहे. तर घराशेजारी लावलेली झाडे व भात शेतीत वाहून गेली.