
दोडामार्ग : दोडामार्गमधून यापुढे गोमांसाची तस्करी आढळली तर पोलिसांनी विचारही केला नसेल असं "न भूतो न भविष्य" आंदोलन उभं राहील आणि त्यानंतर उमटणारे पडसाद पोलिसांना परवडणारे नसतील, असा गंभीर इशारा दोडामार्ग येथे काढलेल्या हिंदू रक्षा महारॅलीच्यावतीने पोलिसांना देण्यात आलाय.
गोमातेच्या रक्षणार्थ आणि हिंदू धर्मासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना अडकविण्यासाठी पोलिसांनी जे षडयंत्र केलं त्याचाही हिंदू संघटनाच्यावतीने धिक्कार करण्यात आला.
दोडामार्गमध्ये हिंदू बांधवांवर झालेले अन्याय व खुले आम होणारी गोमांस वाहतूक यावर आळा घालण्यासाठी शनिवारी विविध हिंदू संघटनांनी एकत्रित येत रस्त्यावर उतरत हिंदू रक्षा महारॅलीतून हिंदू बांधवांनी दोडामार्ग शहरात महा रॅली काढत हिंदू समाजाची ताकद दाखवून दिली. आमचे जे हिंदू बांधव, हिंदू धर्म राक्षणासाठी रस्त्यावर उतरले आणि त्यांच्यावर विनाकारण जे मोठंमोठे गुन्हे दाखल केले, आमच्या कार्य कर्त्यांना अडकविण्यासाठी पोलिसांनी षडयंत्र केले. त्याचा हिंदू रक्षा समिती आणि तमाम सर्व हिंदू बांधवानी जाहीर निषेध करत असल्याचा मुख्य चौकात आयोजित सभास्थळावरून हल्लाबोल करण्यात आला. तत्पूर्वी दोडामार्ग सावंतवाडा राष्ट्रोळी मंदिर येथे श्री देवाला श्री फळ ठेवून सांगणे करून घोषणा देत महा रॅलीला सुरवात केली. यावेळी गोमाता पूजन व आरतीही करण्यात आली. यां रॅलीत सिंधुदुर्ग सह गोव्यामधील विविध संघटनाचे पदाधिकारी महिला वर्ग, दोडामार्ग व्यापारी संघ, बचत गट व हिंदू बांधव मोठ्या संखेने सहभागी झाले होते. त्यामुळे संपूर्ण दोडामार्ग बाजारपेठमधून हिंदू रक्षा रॅली च्या माध्यमातून हिंदू बांधवानी दिलेल्या घोषणांनी दणाणून परिसर गेली होती.
दोडामार्ग मुख्य पिंपळेश्वर चौक येथे रॅली आल्यावर बऱ्याच संघटनाच्या प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणातून मनोगते व्यक्त केली. यावेळी दोडामार्ग मधून यापुढे गोमांस वाहतूक खपवून घेणार नाही. चुकूनही असा प्रकार निदर्शनास आला याद राखा. यापुढे आमच्या हिंदू महिला रस्त्यावर उतरतील आणि प्रसंगी गोमांस वाहतुक करणारी गाडीच नाही तर असे कृत्य करणाऱ्यांचे लंका दहन करण्यासाठी आमच्या हिंदू धर्माच्या रणरागिणी सज्ज असतील हे पोलिसांनी लक्षात ठेवावं. काही झालं तरी दोडामार्ग सिंधुदुर्ग मधून होणारी गोमांस तस्करी पोलिसांनी मोडीत काढावी. जर असे प्रकार घडलेच नाही तर हिंदू बांधवाना टोकाच पाऊल उचलण्याची आवश्यकताच भासणार नाही. यासाठी सावध व्हा असा सज्जड दमच यां हिंदू महारॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.









