प. पु. आनंदनाथ महाराजांचा पुण्यतिथी निमित्त 'संचारस्थळे' ग्रंथाचे लोकार्पण

Edited by: दिपेश परब
Published on: June 13, 2024 06:18 AM
views 356  views

वेंगुर्ला : ज्येष्ठ शुद्ध षष्ठी, बुधवार १२ जून २०२४ रोजी वेंगुर्ले श्री स्वामी समर्थ आत्मलिंग पादुका मठ येथे प.पु. आनंदनाथ महाराजांच्या समाधी प्रवेशाला १२१ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त संचारस्थळे या ग्रंथाचे लोकार्पण व पूजन करण्यात आले. प.पु. आनंदनाथ महाराज्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या समाधी स्थळी सकाळी त्यांचे वंशज सचिन वालावलकर यांचया हस्ते लघुरुद्र करण्यात आले. यानंतर दुपारी महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. 

प. पु. आनंदनाथमहाराजांच्या समाधीवर 'संचार स्थळे' ग्रंथ निर्मिती करण्याचे ६ महिन्यांपूर्वी ठरवण्यात आले होते.  त्यांच्या आशीर्वादाने  तसेच श्री स्वामी समर्थ यांच्या आविष्कारामुळे पूर्ण झालेल्या या ग्रंथाचे पूजन प.पु आनंदनाथ समाधीस्थान व आनंदनाथ स्थापित श्रीस्वामी मठात करण्यात आले. श्री आनंदनाथ महाराजांचे पणतू सच्चिदानंद तथा सचिन वालावलकर यांच्या हस्ते याचे लोकार्पण करण्यात आले.  यावेळी मठाच्या व्यवस्थापक सुनीता सापळे यांना आनंदनाथांचे वंशज सचिन वालावलकर यांनी श्री आनंदनाथ समाधी स्थानावर 'संचारस्थळे ग्रंथ प्रदान केला.