सिंधुदुर्गात निसर्गाच्या साथीने दरडोई उत्पन्न वाढवता येईल : रवींद्र चव्हाण

पर्यटनातून जलदगतीने जिडीपी वाढू शकतो
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: January 31, 2024 10:06 AM
views 284  views

मालवण : 36 वा व्यापारी एकता मेळावा // पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे भाषण // व्यापारी म्हणून एक चांगलं वातावरण असणं गरजेचं आहे // कोणताही व्यापार वित्तीय संस्थेवर असतो // प्रत्येकाचे बँकेत खाते असायला हवे // पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक योजना आहेत // गेल्या 75 वर्षाच्या काळातील कायदे लाल फितीत अडकून बसले // त्यांना कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला नाही // परंतू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायगड किल्ल्यासाठी प्रयत्न केला // इकडे मी केले // त्यातून राजकोट किल्ल्याची स्थापना झाली // व्यापाऱ्यांना अनेक कोर्ट, कचेऱ्यातून अडचणीत आणण्याचे काम वेगवेगळ्या दलालांच्या माध्यमातून केलं जात होत // देशात एकच जीएसटी टॅक्स असला पाहिजे // देशातील सर्व वित्तीय मंत्र्यांना एकत्र आणून त्या त्या क्षेत्रात व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये असा जीएसटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं // सर्व प्रकारचे टॅक्स एकत्र आणण्याचे काम त्यांनी केलं // त्याचा सर्वांना झाला // छोट्यात छोट्या व्यापाऱ्यासह मोठ्या व्यापाऱयांमध्ये एकसूत्रता आणण्यात मदत झाली // ग्राहकाला अडचण होऊ नये आणि व्यापाऱ्याला सुद्धा अडचणी येऊ नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काम केले // नवीन उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी मुद्रा सारख्या योजना आणल्या // देशात असणारी अर्थव्यवस्था 11 नंबरला होती ती आता 5 व्या नंबरला आली // वित्तीय संस्था टिकवून ठेवण्याचे काम सर्व व्यापाऱ्यांनी केलं // पर्यटनातून  जलदगतीने जिडीपी वाढू शकतो // सिंधुदुर्गात निसर्गाच्या साथीने येथील दरडोई उत्पन्न वाढवता येऊ शकेल // छोट्या छोट्या उद्योगांना पाठबळ मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत // पालकमंत्री रवींद्र चव्हाण //