
सावंतवाडी : तालुक्यतील माडखोल येथील व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी च्या बी फार्मसी पदवी अंतिम वर्षाचा निकाल ९१ टक्के लागला आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालाची परंपरा कायम राखुन नेत्रदीपक कामगिरी केली.
शैक्षणिक वर्ष २०२३ / २४ मधील अंतिम वर्षातील प्रथम क्रमांक - कुमार बिरूदेव सरगर (8.64 SGPA) द्वितीय क्रमांक - कुमारी ऋतुजा चव्हाण आणि कुमार - श्रेयस कदम (8.36SGPA) तृतीय क्रमांक कुमारी शाभंवी अणसुरकर (8.27 टकके SGPA) यांनी पटकाविला.
अंतिम वर्षातील एकुण १२० पैकी १०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यापैकी ५७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणी तर ५२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा राखल्या बद्द्ल संस्थेचे आधारस्तंभ व प्रेरणास्थान माजी कुलगुरू डॉ वेदप्रकाश पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार डॉ. राहुल पाटील यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेचे प्रशासकीय अधिकारी पंकज पाटील व महाविद्यालयीन प्राचार्य डॉ. सुनील शिंगाडे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.