उद्या मतदान | यंत्रणा सज्ज

Edited by: भरत केसरकर
Published on: May 06, 2024 09:41 AM
views 158  views

सिंधुदुर्ग : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, या मतदारसंघात १९४० मतदान केंद्रे आहेत तर १४ लाख ३८ हजार ४७१ मतदार मतदान करणार आहेत. या मतदारांमध्ये १३ हजार ७६३ मतदान पहिल्यांदाच मतदान करतील. या मतदारसंघात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सिंधुदुर्गात 171 पोलीस अधिकारी, 2042 पोलीस कर्मचारी, 871 होमगार्ड, SRP च्या तीन तुकड्या, QRT, CAPF ची एक एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. एकुणच प्रशासनाने मतदान प्रक्रिया सुरळीत पारपाडण्यासाठी जैयत तयारी केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे व विद्यमान खासदार  विनायक राऊत यांच्यामध्ये थेट लढत होणार असून या लढतीकडे राज्यासह देशाचे लक्ष लागून राहीले आहे.