कोकण पदवीधर मतदार संघासाठी उद्या मतदान

दोन लाख 23 हजार 225 मतदार | निवडणूक रिंगणात १३ उमेदवार | सिंधुदुर्ग जिल्ह्यात १८ ५५१ मतदार जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे : जिल्हाधिकारी किशोर तावडे
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 25, 2024 14:38 PM
views 91  views

सिंधुदुर्गनगरी :  कोंकण विभाग पदवीधर मतदारसंघाची उद्या दिनांक २६ जून रोजी  निवडणूक होत असून तब्बल १३  उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग  या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात नोंदणी झालेले 2 लाख 23 हजार 225 पदवीधर मतदार आहेत. यातील सिंधुदुर्ग जिल्हात स्त्री 07 हजार 498 व पुरुष 11 हजार 053  एवढे मतदार आहेत. या जिल्ह्यात ३४ मतदान केंद्रे आहेत. सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत  मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार असून  जास्तीत जास्त मतदारांनी  मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन  सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे.

कोकण पदवीधर मतदार संघात 13 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. कीर रमेश श्रीधर, इंडियन नॅशनल काँग्रेस, डावखरे निरंजन वसंत, भारतीय जनता पार्टी, विश्वजित तुळशीराम खंडारे, भीमसेना, अमोल अनंत पवार, अपक्ष, अरुण भिकण भोई (प्राचार्य),अपक्ष,  अक्षय महेश म्हात्रे, अपक्ष, गोकुळ रामजी पाटील, अपक्ष, जयपाल परशूराम पाटील, अपक्ष, नागेश किसनराव निमकर,अपक्ष,  प्रकाश वड्डेपेल्ली, अपक्ष,  मिलिंद सिताराम पाटील, अपक्ष, ॲड. शैलेश अशोक वाघमारे, अपक्ष, श्रीकांत सिध्देश्वर कामुर्ती,अपक्ष असे आहेत.

कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान बुधवार 26  जून 2024 रोजी  सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत या वेळेत होणार आहे.  अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोकण विभागाचे उपायुक्त (सामान्य) अमोल यादव यांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात  १८ हजार ५५१ मतदार 

 मागील निवडणुकीच्या तुलनेत यावर्षीच्या मतदारांमध्ये  मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यात यापूर्वी केवळ साडेपाच हजार येवढेच मतदार होते.मात्र यावेळी यात मोठ्ठी भर पडली असून या वेळी ही संख्या तब्बल १८ हजार ५५१ येवढे झाले आहे.हे सर्व मतदार आपला कौल कोणाच्या बाजूने देतात हे आज मतदान पेटीत बंद होणार आहे.

३४ मतदान केंद्र

पूर्वीची 21 मतदान केंद्र होती. कणकवली, कुडाळ, वेंगुर्ला या ठिकाणी मतदारांची संख्या वाढल्यामुळे  तहसीलदार कार्यालयात असलेल्या या मतदान केंद्रांना सहाय्यक मतदान केंद्र दिली आहेत. त्यामुळे आणखी चार मतदान केंद्रात वाढ होणार होती मात्र मतदारांमध्ये झालेली वाढ पहाता आता एकूण ३४ मतदान केंद्र मंजूर करण्यात आली आहेत. 

      

 

                                                                          कोकण विभाग पदवीधर मतदार संघ मतदारांची संख्या*

 १)पालघर जिल्हा स्त्री 12 हजार 987 व पुरुष 15 हजार 930 तर तृतियपंथी 8


२) ठाणे जिल्हा स्त्री 42 हजार 478 व पुरुष 56 हजार 371 तर तृतियपंथी 11


३) रायगड जिल्हा स्त्री 23 हजार 356 व पुरुष 30 हजार 843 तर तृतियपंथी 9, 


४)रत्नागिरी जिल्हा स्त्री 09 हजार 228 व पुरुष 13 हजार 453 तर तृतियपंथी 0, 


५)सिंधुदुर्ग जिल्हा स्त्री 07 हजार 498 व पुरुष 11 हजार 053 तर तृतियपंथी 0, 


*एकूण 2 लाख 23 हजार 225 नोंदणी होणाऱ्या पदवीधर मतदारांची संख्या आहेत.*