कणकवली नगरपंचायतीत मतदान जनजागृती !

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 24, 2024 14:19 PM
views 77  views

कणकवली : कणकवली नगरपंचायत, DAYNULM,  उपविभागीय  अधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालय कणकवली निवडणूक विभाग  यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली शहरातील नागरिकांसाठी मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन कणकवली नगरपंचायत बहुउद्देशीय हॉल येथे  करण्यात आले होते.

यावेळी तहसीलदार कार्यालय कणकवलीचे गोदाम व्यवस्थापक श्री दिलिप पाटील , तलाठी श्री गणेश गोडे, निवडणूक कर्मचारी श्री महेश सुतार, कणकवली नगरपंचायतचे  कर्मचारी मनोज धुमाळे, अमोल भोगले, ध्वजा उचले,  रुचिता ताम्हणकर, CLC व्यवस्थापिका सिद्धी नलावडे, जिजाई वस्ती स्तर संघ अध्यक्ष ज्योती रावराणे, सर्व कार्यकारणी व बचत गटातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

            यावेळी नवीन मतदार नोंदणी, मतदान हक्क,  मतदान करणे का आवश्यक आहे. EVM मशीन व VVPAT याविषयी उपस्थित महिलांना दिलिप पाटील, गणेश गोडे  यांनी मार्गदर्शन केले. तसेच मतदान जनजागृती विषयी निवडणूक विभाग कडून प्रसारित करण्यात केलेल्या काही व्हिडीओ क्लिप ही दाखविण्यात आल्या.