घोटगे ग्रामपंचायत निवडणुकीत भक्ती दळवी यांना मतदारांचा उदंड प्रतिसाद !

डबघाईला आलेली ग्रामपंचायत सावरण्याला प्राधान्य !
Edited by: संदीप देसाई
Published on: December 17, 2022 21:50 PM
views 343  views

 दोडामार्ग : घोटगे ग्रामपंचायत सरपंच पदाच्या थेट सरपंच पदाच्या प्रभावी उमेदवार म्हणून आपल्या विकास कामांचा अजेंडा मतदारांना नियोजनबद्धरित्या समजून सांगणाऱ्या उमेदवार सौ. भक्ती भरत दळवी यांना मतदारांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.    त्यामुळे उद्याच्या मतदानात कोण आघाडीवर राहतो, आणि कोण गावच्या सरपंच पदी विराजमान होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

 घोटगे ग्रामपंचायत सरपंच पदासाठी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते भक्ती भरत दळवी निवडणूक  रिंगणात उतरल्या आहेत. गेल्या दहा वर्षांत गावचा विकासाचा राहिलेला बॅकलॉग भरून काढण्याचे अभिवचन त्यांनी ग्रामवासियांना दिले आहे. ग्रामपंचायत डबघाईत आली असल्याने पहिलं तिला सावरण आणि नळ पाणी योजनेचे वीज बिल न भरल्यामुळे वारंवार नळ योजना बंद रहाते, ती नियमित करणे ही दोन कामे त्यांनी प्राधान्याने आपल्या जाहीरनाम्यात नमूद करत करणार असल्याची ग्वाही दिली आहे. तसेच ग्रामपंचायत भिंतीला पडलेल्या मोठा भेगा, जीर्ण झालेलं छप्पर आणि ग्रामपंचायत इमारत कधीही कोसळण्याची भीती असल्याने गावचे हे ग्रामविकासाच मंदिर नव्याने उभारण्याचा संकल्प त्यांनी या निवडणूकला सामोरे जाताना समोर ठेवला आहे. इतकेच नव्हे तर ग्रामपंचायतीचे वीज बिल न भरल्यामुळे कित्येक महिने ग्रामपंचायत काळोखात आहे. अशा या वाईट परिस्थितीबरोबर ठप्प असलेली विकास कामे गतिमान करून गावातील प्रमुख अंतर्गत रस्ते , गटार, पायवाटा यांना प्राधान्य देणार असल्याचे भक्ती दळवी यांनी म्ह्टले आहे. 

         घोटगे गावात कार्यरत आसलेल्या महिलांचे बचत गट बळकटीकरण करणे, बचत गटाना चालना देणारे लहान लघु उद्योग उभारणे. त्यातून महिला सक्षमीकरण  करणे. गावच्या विकासाचा सूक्ष्म नियोजन करून सर्वांगीण विकास हाच ध्यास घेऊन सरपंचपदी  काम करणार असल्याची आपली भूमिका मतदार व गावकऱ्यांना त्यांनी पटवून दिल्याने, भक्ती दळवी घोटगे गांवात पहिल्या पसंदीच्या उमेदवार बनल्या आहेत. 

        प्राथमिक शाळा घोटगे ते अशोक दळवी (बायकारवाडी) पर्यंत रस्ता करण्याचे नियोजन, जेणेकरुन गावाची वस्ती त्या रस्त्यालगत वाढणार आहे. जी गावाकऱ्यांच्या मनात विकासात्मक गावाची संकल्पना आहे ती नक्कीच गावात राबविली जाईल, गावात विकासाबरोबर ज्या प्रशासकीय तालुक्यात, जिल्ह्यात गावची ओळख निर्माण करून देणाऱ्या स्वच्छ ग्रामपंचायत, स्मार्ट ग्रामपंचायत, अशा अनेक योजना आपण राबवू, त्यासाठी साथ द्या, असं आवाहन भक्ती दळवी यांनी करत मतदार व गावकरी यांना सहकार्याची हाक दिल्याने त्यांना मोठा पाठिंबा मिळाला आहे.