
सावंतवाडी : शहरात विनायक राऊत यांना मिळालेली पाच हजार मते ही निष्ठेची, प्रामाणिक मतदारांची असून हे मतदार पैशांला बळी पडले नाहीत अशी प्रतिक्रीया सावंतवाडी उबाठाचे शहरप्रमुख शैलेश गवंडळकर यांनी दिली. तर पैशासाठी मत विकणाऱ्या मतदारांनी चांगल्या उमेदवारांचा घात केला असून नक्कीच त्यांना थोड्या दिवसात विनायक राऊतांची आठवण येईल असे त्यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, संघटना म्हणून पक्ष व चिन्ह गेल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. प्रत्येक पदाधिकारी यांनी आपापल्या क्षमतेने प्रचार केला.काही गोष्टी कमी पडल्या तरी आपण कुठे मागे राहिलो नाही. येणाऱ्या परिस्थितीवर मात केली. मतदारांचा शिवसेने पायी असलेला उत्साह पाहून वाटत होते मतपेटीत मशालच पुढे असेल. पंरतू, असे झाले नाही. खासदारांना आलेले अपयश आमचे सर्वाचे असून आम्ही सर्वजण भागीदार आहोत ज्याप्रमाणे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात काही शिल्लक नसताना झंझावात निर्माण करून यश मिळविले तीच उर्जा घेऊन कामाला लागू असे ही श्री गवंडळकर यांनी आपल्या पत्रकात नमूद केले आहे.