प्रश्न मार्गी लावण्यासाठी रमेश कीर यांना मतदान करा : विलास गावडे

Edited by: दिपेश परब
Published on: June 23, 2024 12:09 PM
views 213  views

वेंगुर्ले : रोजगार निर्मिती करण्यात सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे अनेक पदवीधर आजही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. पदवीधरांच्या समस्या सोडवितानाच जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या आग्रही मागणीसह अनेक समस्या मार्गी लावण्यासाठी कोकण पदवीधर मतदारसंघात रमेश कीर यांच्यासारख्याच सक्षम उमेदवाराची गरज आहे शिक्षकांनी आपल्या विविध समस्या हक्काने सोडवून घेण्यासाठी रमेश कीर यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन राष्ट्रीय कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास गावडे यांनी वेंगुर्ले येथे केले.

कोकण पदवीधर मतदारसंघाचे इंडिया आघाडीतील राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचाराचा शुभारंभ वेंगुर्लात करण्यात आला येथील पाटकर हायस्कूलमध्ये शिक्षकांना मार्गदर्शन करताना विलास गावडे बोलत होते यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे वेंगुर्ले तालुकाध्यघ्न विधाता सावंत, शहराध्यक्ष प्रकाश डिचोलकर, येथील पाटकर हायस्कूलचे मुख्याध्यापक आत्माराम सोकटे, प्रा महेश बोवलेकर व ठायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे सर्व प्राध्यापक उपस्थित होते

वेंगुर्ले येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल व वेंगुर्ले हायस्कूल येथेही भेट देत शिक्षकवर्गाला रमेश कीर यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रीय काँग्रेसतर्फे इंडिया आघाडीतील सर्व मित्रपक्षांना सोबत घेऊन कीर यांचा प्रचार सुरू करण्यात आला आहे वेंगुर्लातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून कीर यांना मतदान करण्यासाठी प प्रोत्साहित केले जाणार आहे अशी माहिती तालुकाध्यक्ष विधाता सावंत यांनी दिली.