दोडामार्ग बाजारपेठेतील विठ्ठल भक्तांची दोडामार्ग ते साखळी वारी

Edited by: संदीप देसाई
Published on: July 01, 2023 20:58 PM
views 90  views

दोडामार्ग : गुरुवारी आषाढी एकादशीदिनी दोडामार्ग बाजारपेठेतील नागरिक तसेच युवक महिलावर्ग यांची दोडामार्ग ते साखळी ( गोवा ) येथील विठ्ठल मंदिरापर्यंत पायी वारी संपन्न झाली. या वारीमध्ये प्रथमोचार बॉक्स, पाणी तसेच अन्य सोयीसुविधा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. 

दोडामार्ग पासून जवळच असलेल्या साखळी - गोवा येथील विठ्ठल मंदिरात आषाढी व कार्तिकी एकादशी दिनी मोठा उत्सव साजरा होतो. गोव्यातील प्रतिपंढर पूर म्हणून ओळखण्यात येणाऱ्या या विठ्ठल मंदिरात भक्तांची मांदियाळी जमते. अनेक ठिकाणाहून वाऱ्या या मंदिरात दाखल होतात. यंदाच्या वर्षी येथील बाजारपेठेतील नागरिक युवक तसेच महिला यांची वारी साखळी येथे गेली होती. या वारीचे आवश्यक सोयीसुविधांसाह चोख नियोजन करण्यात आले होते. वारीला मुख्य चौकातून सकाळी 6 वाजता सुरुवात झाली होती.