वैभव नाईकांच्या निवासस्थानी नार्वेकरांची भेट

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: August 13, 2024 13:27 PM
views 51  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले विधान परिषदेचे आमदार, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी आमदार वैभव नाईक, पत्नी स्नेहा नाईक, मुलगा राजवर्धन नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख  संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव आदी उपस्थित होते.