
वेंगुर्ले : भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता महा अभियान २०२५ अंतर्गत वेंगुर्ले शहरातील सदस्यता नोंदणी बूथ ला महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी सदस्यता नोंदणी मोहिमेचा आढावा घेतला.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, अँड.सुषमा खानोलकर, तालुकाध्यक्ष सुहास गावंडळकर, महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, माजी नगरसेवक नागेश गावडे, शितल आंगचेकर, श्रेया मयेकर, कृपा मोंडकर तसेच वसंत तांडेल, दादा केळुस्कर, दाजी परब, सायमन आल्मेडा, पप्पू परब, भूषण सारंग, अभि वेंगुर्लेकर, सुजाता देसाई, मयुरेश शिरोडकर, हेमंत गावडे, बंड्या पाटील, रवींद्र शिरसाट, हसीनाबेन मकानदार, प्रितम सावंत व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.