
देवगड : प्रसिद्ध गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी प्रथमच तालुक्यातील किल्ले विजयदुर्गला भेट देऊन माहिती जाणून घेतली. यानिमित्त किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्यावतीने त्यांचे उत्साही स्वागत करण्यात आले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी गीता पांचाळे याही उपस्थित होत्या. आपल्या गझल गायनाने रसिकांच्या मनाला मोहिनी घालणाऱ्या भीमराव पांचाळे यांनी किल्ले विजयदुर्गला भेट देऊन माहिती जाणून घेतली. मार्गदर्शकांकडून (गाईड) त्यांनी बारकाईने किल्ला समजून घेतला. सुरुवातीला किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक राजीव परुळेकर, सचिव बाळा कदम, यशपाल जैतापकर, आदींनी चाफ्याची फुले देऊन त्यांचे स्वागत केले. या स्वागताने श्री. पांचाळे कुटुंबीय आणि त्यांचे सहकारी यशपाल मुंबरकर खूप भारावून गेले.
समितीने पर्यटकांसाठी केलेल्या विसावा केंद्रात कवी बाळा कदम यांनी आपल्या अस्खलित मालवणी भाषेतील 'तेंव्हाचो पाऊस...' ही कविता सादर करून पांचाळे यांचे मन जिंकले. अत्यंत धावत्या भेटीत किल्ला दर्शन करावे, असे ठरवून आलेल्या भीमराव पांचाळे आणि त्यांचे कुटुंबीय यशपाल जैतापकर यांच्या ओघवत्या वाणीतून विजयदुर्गचा इतिहास आणि त्याचे स्थापत्यशास्त्र समजावून घेतान तळपत्या उन्हातही किल्ले दर्शनाच्च मनमुराद आनंद घेतला. अजूनह विजयदुर्ग पाहणे, समजावून घेण अर्धेअधिक बाकीच आहे. त्यामुळे लवकरच पुन्हा परत येऊ असे सांगून त्यांनी विजयदुर्गचा निरोप घेतला.