
मालवण : आरोग्य उपसंचालक कोल्हापूर विभाग डॉक्टर दिलीप माने यांनी ग्रामीण रुग्णालय पेंडूर कट्टा व ग्रामीण रुग्णालय मालवण येथे भेट दिली. केंद्रीय कॉमन रेव्ह्यू मिशन पुढील महिन्यात जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने त्याची पूर्वतयारी व आढावा त्यांनी यावेळी घेतला. मालवण व पेंडुरं ग्रामीण रुग्णालयात सुमारे 500 च्या वर डायलिसिस रुग्णांना सेवा दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. इतर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम असंसर्गिक कार्यक्रम व कुटुंब कल्याण कार्यक्रम लसीकरण कार्यक्रम औषध पुरवठा रिक्त मनुष्यबळ आयुष्मान भारत गोल्डन कार्ड, आभा कार्ड, क्षयरोग व लेप्रसी तसेच हत्तीरोग मलेरिया डेंग्यू व इतर साथीच्या आजारांबाबत आढावा घेतला
औषध साठा सुसज्ज ठेवणे ,प्रसुती सेवा वाढविणे, रुग्णालयातील अंतर्गत व बाह्य परिसर स्वच्छता ठेवण्याबाबत सूचना दिल्या. ग्रामीण रुग्णालय पेंडूर येथे संभाव्य क्रिटिकल केअर युनिट च्या जागेबाबत पाहणी केली. मालवण ग्रामीण रुग्णालय श्रेणी वर्धन करून 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय करण्यासंदर्भात येत असलेल्या जागा व इतर अडचणी संदर्भात इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालया प्रमाणे अडचणी सोडवणे, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना लागू करणे, व पेंडुर् कट्टा येथे प्रस्तावित डायलिसिस युनिट,NUHM अन्तर्गत नागरी आशा, अर्बन हेल्थ सेंटर इत्यादी विषयांवर चर्चा सकारात्मक झाली. जिल्हा शल्यचिकि्सक डॉ.श्रीपाद पाटील, निवासी वैदयकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही ग्रामीण रुग्णालये प्रगती पथावर वाटचाल करत असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ स्वप्निल बोधमवड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ धनगे, विस्तार अधिकारी सूरज बांगर, वैद्यकीय अधिकारी डॉ अतुल गंडाले, डॉ मोंडकर, डॉ आदिल, डॉ विजय वेरुलकर ,डॉ मेहेंदळे डॉक्टर गावकर डॉक्टर वैभव गावकर, डॉक्टर कदम डोके अधीपरीचारिका सौ संतोषी देसाई, सौ सावंत, सौ कुबल, सौ कदम सौ रणदिवे हेमांगी आरोग्य सहाय्यक कोरडे, विनायक सावंत वरिष्ठ सहाय्यक सौ मीनल वस्त श्रीमती तळावडेकर क्ष किरण तंत्रज्ञ केळुस्कर सौ कोरडे फार्मा ऑफिसर रघुवीर नकाशे, जोउजल, लॅब टेक्निशियन श्री सुनील खूपसे,जिल्हा समन्वयक राजेश पारधी व सर्व कर्मचारी उपस्थित होते. होतं असलेली निवडणूक कार्यक्रम, केंद्रीय कॉमन रिव्ह्यू मिशन जिल्हा दौरा पार्श्वभूमीवर कर्मचारी यांनी कर्तव्यावर राहणे बाबत सूचना दिल्या.