जिल्हा - तालुका क्रीडा संकुल होण्याची गरज | अर्चना घारेंनी वेधलं जिल्हाधिकाऱ्यांचं लक्ष

Edited by: विनायक गावस
Published on: July 29, 2023 13:25 PM
views 134  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंच्या विविध समस्यांबाबत जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांची राष्ट्रवादीवादी कॉग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी भेट घेतली. सिंधुदुर्ग हा तळ कोकणातील जिल्हा असून नैसर्गिक विविधतेने नटलेले या जिल्ह्याचे नाव यापूर्वी अनेक खेळाडूंनी उज्वल केले आहे.

ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळात खेळाला राजाश्रय मिळत होता तसेच आजच्या काळात खेळाला शासनाने प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. खेळाडूंच्या समस्या सोडवण्यासाठी उत्कृष्ट प्रतीचे जिल्हा क्रीडा संकुल व तालुका क्रीडा संकुल होणे हे अत्यंत गरजेचे आहे. मैदानी खेळांसाठी जिल्हा पातळीवर चांगल्या प्रतीचे प्रशिक्षक, पंच आदी सुविधा निर्माण करत जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची अपेक्षा या भेटीदरम्यान अर्चना घारेंनी व्यक्त केली. निश्चितच पुढच्या काळात खेळासाठी प्रशासनातर्फे काही चांगले निर्णय घेतले जातील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.