
कणकवली : तालुक्यात विविध पर्यटन स्थळ आहेतच पण प्रामुख्याने कणकवली रेल्वे स्थानक परिसराचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सुशोभीकरण केल्यामुळे आता या ठिकाणी शाळेतील लहान मोठी मुलं येथे सहलीच्या निमित्ताने येऊन भेट देत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी सांगितले.
इथे उभे असलेले विविध प्राण्यांचे स्टॅच्यू, तसेच शोभिवंत फुलझाड्यांसोबत फोटो काढणे ते पसंत करत आहेत. तर काही लहान मुले येथे असलेल्या गार्डनमध्ये खेळण्याचा आनंद घेत आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्वात उंच राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण येथे होत असल्याचे शिक्षक या मुलांना सांगताना दिसतात याच दरम्यान एखादी ट्रेन स्थानकात आली तर लहान मुलांना ट्रेन दाखवतात त्यामुळे मुले आनंदित होतात.
त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सर्व स्तरातून आता कणकवली रेल्वे स्थानक हे एक पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येत आहे. या संपूर्ण परिसराची देखभाल दुरुस्ती देखील स्वतः आपण लक्ष देऊन करून घेत असल्याचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी सांगितले.