भाजपच्या सरपंच, उपसरपंच संघटना वेंगुर्ला तालुकाध्यक्षपदी पप्पू उर्फ विष्णू परब

Edited by: दिपेश परब
Published on: July 10, 2023 15:36 PM
views 220  views

वेंगुर्ला : भारतीय जनता पार्टी च्या सरपंच, उपसरपंच संघटना वेंगुर्ला तालुकाध्यक्ष पदी परबवाडा उपसरपंच पप्पू उर्फ विष्णू परब यांची निवड करण्यात आली. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी याबाबतचे पत्र पप्पू परब यांच्याकडे सुपूर्द करत त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. 

     वेंगुर्ला तालुक्याती सरपंच व उपसरपंच यांची सभा रविवारी (९ जुलै) वेंगुर्ला भाजपा कार्यालयात जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी या सभेत सरपंच व उपसरपंच संघटना अध्यक्ष पदी परबवाडा उपसरपंच पप्पू उर्फ विष्णू परब यांची एकमतान निवड तर उपाध्यक्ष पदी अणसुर सरपंच सत्यविजय गावडे व भोगवे सरपंच प्रणिती आंबडपालकर, चिटणिस पदी रेडी सरपंच रामसिंग राणे आणि बाकी तालुक्यातील सर्व सरपंच व उपसरपंच सदस्य म्हणुन निवड करण्यात आली.

निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केल. यावेळी बाबली वायंगणकर, मनवेल फर्नांडिस, समीर कुडाळकर यांच्यासाहित भाजप पदाधिकारी उपस्थित होते.