वेंगुर्ला भाजप मंडळ अध्यक्षपदी विष्णू परब

Edited by: दीपेश परब
Published on: April 20, 2025 20:59 PM
views 216  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुका भाजप मंडळ अध्यक्षपदी तालुक्यातील परबवाडा ग्रामपंचायतचे उपसरपंच विष्णू उर्फ पपू परब यांची निवड करण्यात आली आहे. पपू परब यांनी यापूर्वी परबवाडा सरपंच, सरपंच संघटना अध्यक्ष, भाजप वेंगुर्ला तालुका सरचिटणीस अशी पदे भूषवली आहेत. भाजप संघटना वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या व पक्षाच्या एका सच्च्या कार्यकर्त्याला संघटनेचे तालुकाध्यक्ष पद दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

   माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षित कार्य करणार असून वेंगुर्ला तालुक्यात भाजप १ नंबरचा पक्ष बनवण्याचा विश्वास यावेळी पपू परब यांनी व्यक्त केला.