भारतीय साहित्य - सांस्कृतिक मंच सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिध्दी प्रमुखपदी विष्णू धावडे !

Edited by: संदीप देसाई
Published on: January 04, 2024 14:54 PM
views 294  views

देवगड : देवगड तालुक्यातील तांबळडेग गावचे सुपुत्र पत्रकार विष्णू धावडे यांची भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्ध प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष विशाल नामदेव शिरसाट यांनी नियुक्तीपत्र देऊन धावडे यांची निवड झाल्याचे जाहीर केले आहे.

आपली साहित्य कला सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरी पाहून साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध समस्या सोडविण्याबाबत  दिलेल्या योगदानाबद्दल आम्हाला अभिमान वाटतो म्हणून आपली भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती करत आहोत असे या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.