विशाल परब युवाईसाठी आयडॉल : विवेकानंद नाईक

विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त 'होम मिनिस्टर'चा शानदार शुभारंभ
Edited by: भरत केसरकर
Published on: October 12, 2023 15:48 PM
views 186  views

दोडामार्ग : विशाल परब हे आज यूवाई साठी आयडॉल आहेत. मुलाने असं कार्य केल पाहिजे की, त्याच्या आई वडिलांची ओळख मुलाच्या नावाने झाली पाहिजे, असच अभिमानास्पद काम विशाल परब करत आहेत. असे प्रतिपादन विवेकानंद नाईक यांनी केलं. विशालजीनी या जिल्ह्यात वैभववाडी ते दोडामार्ग इथपर्यंत जोडलेली माणसे हेच त्यांचे वैभव आहे.


विशाल परब यांच्या वाढिवसानिमित्त दोडामार्ग शहरात सुशीला हॉल मध्ये पहिल्यांदाज रंगलेल्या भव्य न्यू होम मिनिस्टर स्पर्धेला दोडामार्ग तालुक्यातून उदंड प्रतिसाद मिळाला. युवा उद्योजक विशाल पुरस्कृत व नगराध्यक्ष चेतन चव्हाण व त्यांच्या टीमने ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी घेतलेल्या मेहनती मुळे दोडामार्ग मधील हजारो महिलांना मोठ्या व्यासपीठावर व दिग्गज भाऊ सोबत रंगतदार खेळ पैठणीचा खेळता आला. विशाल परब आप आहे बडो हम आपके साथ है असा विश्वास यावेळी आयोजक चेतन चव्हाण यांची टीम आणि हजारोंच्या संख्येने या न्यू होम मिनिस्टर स्पर्धेसाठी उपस्थित महिलांनी विशाल परब यांना दिला.

    विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त ९ ऑक्टोबर पासून जिल्ह्यात विशाल पर्वाला सुरवात झाली आहे. संपूर्ण आठवडा भर चालणाऱ्या या विविध कार्यक्रमांचा शुभारंभ माजी खासदार नीलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ येथे शानदार पाने पार पडला. कीर्तनकार इंदुलकर महाराज यांच्यासारख्या दिग्गज कीर्तनकार यांना जवळून पाहण्याची संधी यानिमित्ताने सिंधुदुर्ग वासियांना मिळाली. त्यांनतर आता दुसरा असाच भव्य कार्यक्रम बुधवारी दोडामार्ग येथे संपन्न झाला. सिने अभिनेता क्रांती माळेगावकर यांच्यासारखा दिग्गज कलावंत दोडामार्ग तालुक्यातील हजारो महिला आणि नागरिकांना जवळून पाहता आला. नव्हे तर त्याच्या सोबत महिला भगिनींना भव्य खेळ पैठणीचा खेळून आपल्यातील गुणांना मोठ्या व्यासपीठावर सादरीकरण करता आले. 


    या भव्य शो चे उद्घाटन यांच्या हस्ते झाले. यावेळी युवा उद्योजक विशाल परब, सौ. वेदिका विशाल परब,नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उप नगराध्यक्ष देविदास गवस, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोरये, विशाल यांचे वडील प्रभाकर परब, आई सौ. प्रमिला परब, बंधू विकास परब, उद्योजक व सामजिक कार्यकर्ते विवेकानंद नाईक, नगरपंचायतचे बांधकाम सभापती नितीन मणेरिकर, नगरसेवक रामचंद्र मणेरीकर, गौरी पार्सेकर, ज्योती जाधव, स्वराली गवस, क्रांती जाधव, संजना म्हावलनकर, सुकन्या पनवेलकर, रंगनाथ गवस, प्रवीण गवस, देवेंद्र शेटकर, वक्रतृंड मंडळाचे अध्यक्ष मनोज पार्सेकर यांसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. दीप प्रज्वलन व छत्रपती शिवरायांना वंदन करून या कार्यक्रमाची सुरवात झाली. विशाल परब यांनी त्यांच्या वाढिवसानिमित्त पहिल्यांदा असा भव्य दिव्य शो दोडामार्ग मध्ये आयोजन करून दोडामार्ग मधील महिला वर्गाला उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठ बद्दल उपस्थित मान्यवरांनी परब यांचं कौतुक केलं. तर अशा कार्यक्रमात संपूर्ण तालुक्यातील महिलांचं सहभाग करून घेण्यासाठी चेतन चव्हाण व त्यांच्या टीमने घेंतलेल्या मेहनतीचे विशाल परब यांनी विशेष आभार मानले.

महिलांसाठी आनंदाचा खेळ !

नेहमीच महिला आपल काम आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यात मग्न असतात, अशावेळी त्यांना रोजच्या रूटीन मधून थोडा विरंगुळा मिळावा, आनंद मिळावा हाच यामागचा उद्देश आहे. या या कार्यक्रमाचं आयोजन केल्याचे  वेदिका परब यांनी सांगितलं.

कार्यक्रमाच्या शुभारंभी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या दोडामार्ग तालुक्यातील महिलांना सन्मानित करण्यात आले. यावेळी दोडामार्ग शहरातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. उपमा गावडे यांना सन्मानित करताना सौ. वेदिका परब, सोबत विशाल परब, चेतन चव्हाण, देविदास गवस, विवेकानंद नाईक व मान्यवर उपस्थित होते.