
सावंतवाडी : भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांना पोलीस संरक्षण देण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने नुकताच घेतला आहे. विशाल परब यांच्यासारख्या शांत संयमी युवा नेतृत्वाला तातडीने पोलीस संरक्षण देण्याची आवश्यकता प्रशासनाला का वाटली असावी? असा प्रश्न विचारला जात आहे. हे कोण आहेत ज्यांच्यापासून विशाल परब यांच्या जीवीताला धोका आहे ? याबाबत पोलिसांकडे योग्य तो अहवाल असेलच पण, विशाल परब यांना पोलीस प्रशासनाने पुरवलेल्या संरक्षणानंतर जनमानसात मात्र चर्चांमधून अनेक प्रश्नचिन्हे उमटू लागले आहेत.
महात्मा गांधींनी सावंतवाडी संस्थानाला रामराज्य असे म्हटले होते. सावंतवाडीकर जनता ही शांतताप्रिय आणि लोकशाहीची बूज राखून आपले रोजचे व्यवहार करणारी जनता आहे. राजकारणातला दहशतवाद, दादागिरी किंवा राडेबाजी अशा प्रकारांना ही जनता कधीही थारा देत नाही. राजकारणाचा विचार केला तर दीपक केसरकर यांच्यासारखा आमदार मतदार संघाबाहेरील अन्य नेत्यांच्या दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करून आणि आपली शांतताप्रिय व्यक्तिमत्व ही छबी प्रस्थापित करून मागील तीन टर्म आमदार पदावर आहे. पण या वेळचे बदललेले राजकारण सावंतवाडी मतदारसंघातील जनतेलाही अस्वस्थ करत आहे.
विशाल परब लोकांना आपले हक्काचे माणूस वाटतात. त्यांची लोकप्रियता जनमानसात वाढीला लागली अनेक प्रस्थापितांना ही बाब अस्वस्थ करू लागली होती. विशाल परब हे आपल्या पंखाखाली असावेत असे अनेकांना वाटत होते. कालपरवाचा युवक अनेकांना अडचणीची वाटू लागला आहे. या युवकाला राजकारणातून बाद करण्यासाठी अनेक कट कारस्थाने यादरम्यान घडल्याची चर्चा आहे. त्यात पोलिस संरक्षण दिल्याने विशाल परब यांचे राजकारण कोणाला मोडून टाकायचे होते ? त्यांचे अस्तित्वच खोडून टाकण्यासाठी ताकद लावली जात होती, त्यांना धमक्या दिल्या जात होत्या? ते प्रश्न उभे राहिले आहेत. त्यात पोलीस प्रशासनाने त्यांना संरक्षण दिल्याने हे प्रश्न जनतेच्या मनात पुन्हा निर्माण झाले आहेत.